पदोन्नतीतील आरक्षण संबंधी बसपाची आक्रमक भूमिकामहाविकास आघाडीविरोधात रस्त्यावरची लढाई लढणार- अँड. संदीप ताजने

सरकारी नोकरीत पदोन्नतील आरक्षण २०१७ पासुन बंद आहे. महाराष्ट्र सरकारने ७ मे रोजी शासन निर्णय काढून हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जीआर काढल्याने समाजात रोष आहे. सरकारच्या निर्णयानूसार राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार करून कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाचा हा निर्णय एससी,एसटी प्रवर्गावर अन्याय करणारा आहे. बसपा हा मुद्दा लावून धरणार असून यासंबंधी शासनाने सकारात्मक निर्णय घेवून पदोन्नतील आरक्षण पुर्ववत केले नाही; तर बसपा रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बुधवारी सातारा येथे आयोजित ‘संवाद यात्रे’च्या कार्यक्रमाला संबोधित करतांना दिला.सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर बसपाचा पुर्ण विश्वास आहे.पंरतु, महाविकास आघाडी सरकारने शासकीय सेवेतील पदोन्नतीत मागासवर्गीय कोट्यासाठी आरक्षित ३३% पदे खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठतेच्या अटीनुसार भरण्याचे जाहीर करीत समाजावर अन्याय केला.त्यामुळे सत्ताधार्यांना योग्य धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.एससी, एसटी, ओबीसी तसेच सर्वप्रवर्गाच्या हितासाठी बसपा कटिबद्ध आहे. ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ चे उदिष्ठ गाठण्यासाठी बसपाला राज्यात आणि देशात मोठा जनाधार मिळत आहे. घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षण, संवर्धनासाठीच बसपाचा जन्म झाला आहे आणि अखेर पर्यंत पार्टीकडून हे काम केले जाईल, अशी ग्वाही अँड.ताजने त्यांनी दिली.आगामी निवडणुकात सत्ताधार्यांना आणि विरोधातील भाजपला बसपाची ताकद बसपा दाखवून देईल.स्थानिक स्वराज स्थंस्थेत बसपा स्वबळावर लढून चमकदार कामगिरी करणार असल्याचा दावा देखील त्यांनी यानिमित्ताने केला. संवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी, तालुका, जिल्हा तसेच शहर पातळीवर पक्षाचे संघटनात्मक रचना कार्यान्वित करण्यात आल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा. प्रमोद रैना यांच्यासह प्रदेश सचिव शंकर माने, जिल्हा प्रभारी नारायण काळेल, जगन्नाथ वाघमारे, जिल्हा अध्यक्ष आनंद थोरवडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश सराटे, जिल्हा संघटक मंत्री अमर गायकवाड तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होत. सातारा जिल्हा ओबीसी संघाचे भरत लोकरे सर, उपाध्यक्ष किसन गुरव, महासचिव प्रमोद क्षीरसागर,सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गजधरणे, शहर अध्यक्ष श्रीकांत आबकर, संघटक समाधान जावळे, कार्याध्यक्ष संजय पोतदार, संघटक प्रा.काळे सर तसेच माजगाव, सातारा ओबीसी बांधव संघटनेचे संघटक प्रकाश फरांदे,सचिव भिकाजीराव सुर्यवंशी यांनी यावेळी बसपाला जाहीर पांठिबा दिला

Latest News