पिंपरी चिंचवड मधील अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक ६ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का देत १ नगरसेवक आपल्या पक्षात घेतला आहे. भाजप आघाडीचे अपक्ष गटनेते व थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे यांनी आज गुरूवारी (दि, मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला

. भाजप संलग्न असलेले अपक्ष आघाडीचे गटनेते व थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.संबंधित बातम्या यापुर्वी भाजपच्या नगरसेविकेचे पती राजू लोखंडे व संतोष बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Latest News