पिंपरी चिंचवड शहराची भाजपाने वाट लावली, शहरात विकासाची नाही तर भ्रष्टाचाराची चर्चा : कैलास बारणे

पिंपरी चिंचवड शहराची भाजपाने वाट लावली, शहरात विकासाची नाही तर भ्रष्टाचाराची चर्चा : कैलास बारणे
पिंपरी : स्मार्ट सिटीने शहर खड्ड्यात गेलं आहे. भाजपच्या सत्तेत विकास कामांऐवजी भ्रष्टाचाराची चर्चा होत आहे. भाजपने केवळ पेविंग ब्लाॅक बदलण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे शहरासाठी भाजपने काय केलं, असा सवाल अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी केला आहे.आज मुंबईत अजीत पवार यांच्या उपस्तित अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे त्या नंतर आयोजित पत्रकार परिषेदेत बारणे बोलत होते
महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादीत प्रवेश केला. विरोधी पक्षनेते कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे, प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते.
शहराचा विकास जलद गतीने व नियोजनबध्द पध्दतीने व्हावा, कचरा, स्मार्ट सिटीने शहर खड्ड्यात गेलं आहे. भाजपच्या सत्तेत विकास कामांऐवजी भ्रष्टाचाराची चर्चा होत आहे. भाजपच्या काळात शहरातील स्वच्छतेची वाट लागली”, . ”पवना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे भाजपाने शहरासाठी त्यांनी किती प्रश्न सोडविले. साडेचार वर्षात काय केलं
. केवळ सोशल मीडियावर कामाच्या भूमिपुजनाचा फोटो टाकतात. नारळ फोडतात. विकास कामासाठी त्यांनी कधी तरतूद केली का, अपक्ष नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. तेही हळूहळू येतील. सर्व अपक्ष नगरसेवक पाठीमागून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत अशी माहिती बारणे यांनी दिली