निगडित चक्क पोलिसांना धमकी, तुम्ही मला पकडू नका, तुम्हाला तलवारीने मारून टाकील

पिंपरी : तुम्ही मला पकडले तर तुम्हाला तलवारीने मारून टाकील”, अशी धमकी देत दोघांनी मिळून पोलिसांशी हुज्जत घातली. ही घटना प्राधिकरण, निगडी येथे घडली. शाहरुख शाहीर शेख (२०, रा. चिखली), गजानन सहदेव पवार (२८, रा. दत्तवाडी, आकुर्डी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सोनू किसन केंगले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे एक लोखंडी तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. गजानन पवार यांच्या हातातून तलवार हिसकावून घेत होते. त्यावेळी त्याने फिर्यादी केंगले यांना “तुम्ही मला पकडू नका, तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने मारून टाकील” अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. तसेच, त्याने शिवीगाळही केली. त्यानंतर पोलिस आरोपींना पोलिस ठाण्यात घेऊन येत असताना आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ केला. पोलिसांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. तसेच, तुम्हाला बघून घेतो, असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.