मोदी सरकार माध्यमांना, उद्योगपतींना ब्लॅकमेल करते – नाना पटोले

मुंबई : केंद्रात ब्लॅकमेलींग करणारे सरकार आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे माध्यमांना, उद्योगपतींना ब्लॅकमेल करते. त्याची प्रतिकृती आता महाराष्ट्रात दिसत आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही असेही पटोले यांनी स्पष्ट केले. मुंबई माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पाटलांच्या आरोपांना उत्तर दिले

आमच्या मंत्र्यांवर आरोप लावले तरी मंत्र्यांचे कोणतेही दोष नसल्यामुळे त्यांच्या आरोपाची भीती नाही. भाजपकडून आरोप होत आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन कसा दुरुपयोग केला जात आहे. सगळा देश पाहत आहे. त्यामुळे एखाद्याने ओरडावे आणि त्याच्याकडे पुर्ण लक्ष द्यावे अशा पद्धतीने कोणताही प्रयत्न नाही. कर नाही तर डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. . ते म्हणाले, आम्हाला कोणत्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही.

त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडी महत्त्व देते आहे. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे असल्याची टीका पटोले यांनी केली.  भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती

. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला. ‘अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे

Latest News