चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावा :रुपाली चाकणकर..
पुणे : महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. पुढे त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
, चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले असून सत्ताधारी नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल डझनभर मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केल्याने सत्ताधारी नेते चांगलेच घायाळ झाल्याचे दिसत आहे
किरीट सोमय्या यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील वेळोवेळी पत्रकार परिषद घेवून सोमय्या यांची पाठराखण करताना दिसून येत आहे. पाटील हे आपल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत आहेत. आज देखील पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.दरम्यान,