राष्ट्रवादी काँग्रेस नें तिकीट नाकारले तर घरी बसेन मात्र भाजपात जाणार नाही : योगेश बहल

पिंपरी ( ) पार्थ पवार यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची मशाल हाती घेऊन येत्या निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याने आता जेष्ठ नेत्यांना डावल जाऊ शकते त्याबाबत तुम्हाला राष्ट्रवादी नें तिकीट नाकारल्यास तुम्ही भाजपात जाणार का? असे विचारले असता बहल यांनी सांगितले की एक वेळ घरी बसेन पण भाजपा त जाणार नाही, शरद पवार आणी अजीत पवार यांनी मला भरपूर सगळे काही दिले आहे त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच नसल्याच बहल यांनी सांगितले
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी नामदेव ढाके यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे ते म्हणाले, नामदेव ढाके यांचे हे विधान म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत तसेच मोदी लाटेच्या जिवावर जे नगरसेवक निवडून आले आहेत.ते स्वतःला आयुक्त , महापौर, सगळेच समजतात
भाजप नगरसेवकाची नावे तरी शहरातील नागरिकांना माहिती आहेत का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला