तळजाई टेकडी वरील १०७ एकर जागे मधील बांबू उद्यान, ऑक्सीजन पार्क प्रकल्प ला स्थगिती द्यावी : भीम शक्ती संघटनेची मागणी

पुणे :- तळजाई टेकडी वरील १०७ एकर जागे मधील बांबू उद्यान, ऑक्सीजन पार्क , अशा अनेक प्रकल्प स्थगिती आणण्याबाबत
तळजाई टेकडी येथील जैवविविधतेत वरील अतिक्रमण त्वरित थांबवावेत.तळजाई टेकडी वरील १०७ एकर जागे मधील बांबू उद्यान, ऑक्सीजन पार्क प्रकल्प ला स्थगिती द्यावी अशी मागणीचे निवेदन भीम शक्ती संघटनेनें उप वन संरक्षक संचालकांना देण्यात आले आहे
हे प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून सादर केले असून १०७ एकर जागेमध्ये सध्याच्या परिस्थितीत विविध वृक्षांच्या पेशी विविध प्राणी पक्षी आणि देशी वृक्षांचे प्राणी अधिक आहेत अशा प्रकारचा प्रकल्प राबवित असताना त्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
तसेच जैवविविधतेत तेला धक्काही पोहोचण्याची शक्यता आहे टेकडीवरील विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, पक्षी ,यांच्याही संचार वरही अतिक्रमण होऊ शकते त्या ठिकाणी देशी झाडांचे प्रमाण अधिक बळकट असल्यामुळे या सर्व गोष्टींना धक्का बसू शकतो तसेच नैसर्गिक वातावरण व जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची जास्त प्रमाणात गर्दी होत असते अनेक असे प्रकल्प राबविल्यानंतर पुणे शहरांमधील एकमेव ठिकाणी ताज्या टेकडीवरती येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे तात्काळ उप वन संरक्षक यांनी स्थगिती द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातं म्हटलं आहे
महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविल्यानंतर नागरिकांना वातावरण सुखदायी आणि आरामदायी ठरणार नाही ,लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानी शिल्लक राहणार नाहीत
सर्व बाबी लक्षात घेऊन आपण तळजाई टेकडी वरील १०७ एकर जागे मधील राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाला लवकरात लवकर स्थगिती मिळवून देण्यात यावी.
अन्यथा भिम शक्ती संघटना पुणे शहराच्या वतीने तिर्व्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मधून विजय रामचंद्र हिंगे यांनी दिला आहे