लखीमपूर’पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत.खा सुप्रिया सुळे

पुणे : लखीमपूर येथील शेतकरी महात्मा गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर गाडी चालवण्यात आली. त्या उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही. बलात्कार झाला,तेव्हाही काही बोलले नाहीत. त्यामुळे मला काहीच आश्चर्य वाटत नाही.त्याबाबत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या घटनेबाबत शरद पवार यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे
पुण्यात मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी भरवण्यात आली, त्या भिडेवाड्याला भेट देण्यासाठी सुप्रिया सुळे आज उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “एवढी घटना होऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत
.तसेच कोणताही अन्याय महिलेवर किंवा शेतकर्यावर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तसेच आम्ही प्रियांका गांधी यांच्या सोबत आहोत.” उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे
. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या पाहणी करण्यास जात होत्या.त्यावेळी तेथील पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्व घटनांबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कधीच अशा गोष्टींवर काही बोलत नाहीत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणाही साधला आहे. त्या पुढे म्हणाल्या,