पिंपरी चिंचवड शहरातील चोवीस तास पाणी पुरवठा संदर्भात आ जगताप, महापौर माई ढोरे यांनी अधिकाऱ्या सोबत घेतली आढावा बैठक

  पिंपरी ( प्रतिनिधी ) जलशुध्दीकरण केंद्राची क्षमतावाढीच्या प्रकल्पाची व टप्पा १ येथील ८० लक्ष लिटर क्षमतेच्या चालु असलेल्या शुध्द पाण्याच्या टाकीच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली व तद्दनंतर वृक्षारोपन केले आणी चोवीस तास पाणी पुरवठा कामाची आढावा बैठक आ जगताप महापौर माई ढोरे यांनी अधिकाऱ्या सोबत घेतली

जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे मा. महापौर श्रीम. माई ढोरे , मा. आमदार श्री. लक्ष्मण जगताप, मा. नगरसदस्य श्री. सागर आंगोळकर , पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री. प्रविण लडकत , विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक अडसुळ उपस्थित होते
          सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे पाणीपुरवठा भविष्यात २४ तास करन्याच्या अनुषंगाने तसेच २४ x ७ योजनेअंतर्गत  प्राधिकरण से. २५ येथे प्रायोगीक तत्वावर  सुरु केलेल्या २४ तास पाणीपुरवठ्या बाबत आढावा बैठक
घेतली

प्राधिकरण पाणीपुरवठा चालु झाल्यानंतर त्यातून आलेला अनुभव, पाण्याची बचत तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया इ. बाबत सादरीकरण करणेत आले. २४ x ७ योजनेअंतर्गत से.क्र. २३,निगडी पासुन डांगे चौकापर्यंत नव्याने १०००मिमी व्यासाची पाईप लाईन टाकणेत आली आहे.

पाईप लाईन मुळे वाकड,थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि सांगवी इ.भागांचा पाणीपुरवठा सुधारणार आहे. याशिवाय शहरात २४ x ७ योजना व अमृत योजनेअंतर्गत नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलणेत आले असुन त्याठिकाणी एम.डी.पी.ई पाईप लाईनचे कनेक्शन करणेत आले आहे

त्यामुळे पाण्याची गळती कमी होऊन पाण्याची बचतही होणार आहे. नागरिकांनी १३५ LPCD  या मानांकाप्रमाणे पाणी वापरणे कामी जनजागृती करणेबाबत मा. आमदार यांनी सुचविले.   याशिवाय मनपा अंतर्गत येणा-या मोठमोठ्या सोसायट्या यांचे Water Audit केल्यास पाण्याची गळती निदर्शनास येईल या बाबतही त्यांनी सुचना दिल्या
      

Latest News