भाजपला रोखण्यासाठी पुणे पालिका निवडणुकीत आघाडी करण्यावर एकमत

पुणे :पुणे: राज्यात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आता महापालिका निवडणुकीही एकत्र लढविणार का याबाबत उत्सुकता आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीच्या घट स्थापनेला पुण्यातून मुहूर्त मिळाला आहे

. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील आघाडीसाठी पहिले पाऊल पडले आहे. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या पहिल्याच बैठकीत आघाडीसाठी जागा वाटपासह विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीच्या घट स्थापनेला पुण्यातून मुहूर्त मिळाला आहे

. राज्यात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आता महापालिका निवडणुकीही एकत्र लढविणार का याबाबत उत्सुकता आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही पक्षांची पहिली प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली

जागा वाटप करताना सेनेला सन्मानजनक पध्दतीने जागा मिळाव्यात अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीनेही आघाडी दोन्ही पक्षांसाठी सन्मानजनक पध्दतीनेच होईल असे आश्वासन यावेळी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आता राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने काँग्रेस स्वतंत्र लढणार का आणि लढल्यास या आघाडीचा आणि भाजपाचा काँग्रेस कसा सामना करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Latest News