पुण्यात काम देतो सांगून, दागिने लुटणाऱ्याला अटक…

पुणे : काम देतो म्हणून तो रिक्षात घेऊन गेला होता. तेथे गेल्यानंतर त्यांने महिलेच्या डोक्यात दगडाने मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला जखमी अवस्थेत तेथेच सोडून आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली होती. पुणे येथे मजूर महिलेला कानिफनाथ डोंगराशेजारी गवत कापण्याचे काम देतो असे सांगून नेले आणि तिला दगडाने मारहाण करत तिचे दागिने लुटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १ सप्टेबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शारदार राठोड यांना एका अनोळखी व्यक्तींना कोणार्क पुरम सोसायटी समोरील कामगार अड्ड्यावरून कानिफनाथ डोंगराशेजारी गवत कापण्याचे
या प्रकरणातील संशयित आरोपीला कोंढवा पोलिसांनी कर्नाटक येथून बेड्या ठोकल्या. श्रीनिवास गणेश जाधव (३०, रा. वाकड काळेवाडी, थेरगाव जगतापनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत शारदा ईश्वर राठोड (४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी याबाबत फिर्याद दिली. याच दरम्यान महिला जखमी अवस्थेत पोलिस ठाण्याला हजर झाली. तिला सुरुवातीला उपचार देऊन तिची तक्रार घेण्यात आली. त्यामध्ये तिने सर्व हकिकत सांगितली. गुन्हा घडल्यानंतर पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, स्वप्निल पाटील व तपास पथकातील अमंलदार यांनी तपास सुरू केला. तपास पथकातील पोलिस अमंलदार किशोर वळे, ज्योतीबा पवार, सतिश चव्हाण, निलेश देसाई यांनी कोंढवा ते वाकड, काळेवाडी थेरगांव, मजुरअड्डा पिंपरी चिंचवडपर्यंत सीसीटिव्ही कॅमेरे तपासले.
पोलिस अमंलदार निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने माहिती मिळवली असता जाधव हा जगताप नगर येथै राहत असल्याचे समजले. तसेच तो मुळचा कर्नाटक येथील देवदुर्गा येथील सावळतांडा येथील असल्याची माहिती मिळाली.
आरोपीचा थेरगांव जगतापनगरमध्ये शोध घेत असताना तो तेथून पसार झाल्याचे समजले. दरम्यान तपासासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या. उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अमंलदार रमेश गरूड, ज्योतिबा पवर, सतिश चव्हाण, निलेश देसाई यांची टीम क्रमांक 1 कर्नाटक येथे आरोपीच्या गावी रवाना करण्यात आली. तर निलेश वनवे, तुषार आल्हाट अभिजीत रत्नपारखी यांची दुसरी टीम जगतापनगर येथे ठाण मांडून होती. दरम्यान, जाधव हा मुळ गावीच असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला त्याच्या मुळ गावातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.