रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल नाही…

मुंबई : MPC च्या अपेक्षांनुसार अर्थव्यवस्था पुढे जात आहे. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे शुक्रवारी तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, ‘आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व्ह बँक सतत प्रयत्न करत आहे की महागाई दर टारगेटच्या आतमध्ये राहील. ते म्हणाले की, एमपीसीच्या सर्व 6 सदस्यांनी पॉलिसी रेटमध्ये बदल न करण्याचे मान्य केले आहे.. रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम आहे.’ यामध्ये 22 मे 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. आरबीआय गव्हर्नर RBI चे महागाई कमी करण्यावर आणि आर्थिक वाढीच्या रिकव्हरीवर सातत्याने विशेष लक्ष्य आहे.
दास म्हणाले की, अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. पण महागाईचं मुख्य आव्हान आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम राहील. दास यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे