प्रा. विष्णू शेळके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जमाती (आदिवासीं) सेलचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा संजोग वाघेरे यांच्या हस्ते मा विष्णु एकनाथ शेळके यांना पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा) आदिवासी सेल अध्यक्ष पदी निवड करून त्यांना आदिवासी सेल अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले
यासंदर्भातील नियुक्ती पत्र शहराध्यक्ष मा. संजोग वाघेरे पाटील यांनी शहर कार्यकारणी च्या बैठकीत त्यांना राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या अनुसुचित जमाती (आदिवासीं) सेलचे शहर जिल्हाध्यक्ष पद सन्मानपूर्वक देण्यात आले
पिंपरी चिंचवड शहरात लाखाहून अधिक लोकसंख्येने आदिवासी बांधव राहत असून विष्णू शेळके हे आदिवासी समाजातील अभ्यासू व धडाडीचे व उच्चशिक्षित कार्यकर्ते असून गेली 24 वर्ष अध्यापनाचे काम करीत असून आता वकिलीचा अभ्यास करीत आहेत. आदिवासीं समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेले एक प्रभावी वक्ता हि त्यांची जनसामान्यांतील प्रतिमा आहे. शहरातील आदिवासी बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला असून त्याकरिता मोर्चे आंदोलने उपोषणे या संविधनिक मार्गाचा ते अवलंब करीत असतात.
शहराच्या सर्व उपनगरातील आदिवासीं बांधवांच्या सर्व जमातीचे एकीकरण हे त्यांच्या कार्यप्रणालीचे सूत्र असून महिला बचत गट महासंघ, वाद्य पथके, पारंपरिक लेझिम पथके यांचे संस्थापक असून आदिवासी समाजाला आपल्या न्याय हक्कांची कायद्याची जाणीव निर्माण व्हावी आपल्या दैदिप्यमान इतिहासाची शौर्याच्या परंपरेचा अभिमान निर्माण व्हावा याकरिता प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी आदिम प्रबोधन पथकाची स्थापना केली वते स्वतः लेखक, कवी शाहीर असल्याने आपल्या सिद्ध हस्त लेखणीतून प्रसवलेल्या गीतांच्या पोवड्यांच्या, प्रबोधनपर गीतांच्या मांध्यामातून राज्यभर शाहिरी जलसे व प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतात
आदिवासी समाजाच्या हक्काचे एखादे प्रसार माध्यम असावे याकरिता आदिम न्यूज चॅनल ची स्थापना केली असून राज्यभरातील 70 हून अधिक तालुक्यातील प्रतिनिधींच्या माध्यमातून समजतील घडामोडी प्रसारित करीत समाजावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडीत असतात शहरात सर्व स्तरातील कष्टकरी कामगार वर्गापासून ते उच्चपदस्थ असधिकारी वर्गातील आदिवासीं बंधावाशी त्यांचे थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी शहरभर मजबूत संघटनात्मक बांधणीही केली आहे
या पदनियुक्तीमुळे त्यांच्या कार्याला अधिक झळाळी व ऊंची प्राप्त होईल असा विश्वास समाजाला आहे समाजातील सर्वच स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा संजोग वाघेरे यांच्या हस्ते मा विष्णु एकनाथ शेळके यांना पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा) आदिवासी सेल अध्यक्ष पदी निवड करून त्यांना आदिवासी सेल अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी महिला अध्यक्षा मा वैशालीताई काळभोर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते मा फजलभाई शेख
मुख्यसंघटक अरुण बोऱ्हाडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय बोऱ्हाडे, लीगल सेल अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन आवटी, अर्बन सेल अध्यक्ष माधव पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदिप चिंचवडे मा नगरसेवक मा राजेंद्र जगताप,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा अरुण पवार ,मा सामाजिक न्याय्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते