भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद,भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंक नाद ‘ अॅपचा पुढाकार

भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद
…………………
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंक नाद ‘ अॅपचा पुढाकार
पुणे :
‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर ९ ऑक्टोबर रोजी आयोजित वेबिनार मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.हे पंधरावे सत्र होते.त्यात गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी ‘ मिश्र व्यवहार ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.
रविवार १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सोळावे सत्र आयोजित करण्यात आले आहे.वर्षभर हा वेबिनार उपक्रम चालणार आहे.
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘ अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.
आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला जाईल. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
…………………………………. …………………….