दंतवैद्यक शास्त्र हे अतिशय कलात्मक आणि ज्ञानाने परिपुर्ण शास्त्र…..डॉ. लालेह भुशेरी

पिंपरी, पुणे (दि. 13 ऑक्टोबर 2021) भारतात वैद्यकीय निरक्षरतेचे प्रमाण लक्षणिय आहे. सुशिक्षित देखील कोणत्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरकडे जावे याची पुर्ण माहिती घेत नाहीत. तसेच दंतवैद्यकीय शास्त्राबद्दल बरेच अज्ञान आहे. वैद्यकीय शास्त्रासह दंत शास्त्रात खूप प्रगती झाली आहे. पूर्वी भारतात दातांचे खूप आजार अस्तित्वात नव्हते. वयोमानाप्रमाणे दात हलणे आणि गळून पडणे हा आजार प्रामुख्याने होता. दंत उपचार पद्धती, यंत्र प्रणाली, त्यात लागणारे साहित्य, त्याचे फायदे तोटे त्यासाठी लागणारे कौशल्य याचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार झाला.
भारतात 1948 च्या डेंटिस्ट ॲक्टनुसार नियम लागू झाले. दंतवैद्यक शास्त्र हे अतिशय कलात्मक, जैविक, यांत्रिक आणि ज्ञानाने परिपुर्ण असे शास्त्र आहे. त्याच्या आठ स्वतंत्र शाखा आहेत. नागरिकांनी यातील निष्नात दंतवैद्याचा सल्ला घेऊन उपचार करावे असे प्रतिपादन कॅन्सर केअर सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. लालेह भुशेरी यांनी केले.
डॉ. अंकिता नगराणी यांच्या बाणेर येथिल ब्युडेंन्ट या दंत शैल्य चिकित्सा रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. लालेह भुशेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचेती हॉस्पिटलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, लेफ्ट. जनरल संजय कनाल, डॉ. अंकिता नगराणी, उद्योजक समीर नगराणी, श्रीमती एस. पी. नगराणी आदी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी डॉ. लालेह भुशेरी म्हणाल्या की, अद्यावत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखिल आमुलाग्र बदल होत आहेत. या विकसित होणा-या तंत्रज्ञानाचा रुग्णांना फायदा होत आहे. या नविन तंत्रज्ञानामुळे माफक दरात उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा रुग्णांना मिळते.
डॉ. अंकिता नगराणी प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, ‘डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणारा रुग्ण म्हणजे देव आहे. त्या रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यानंतर त्यातून खरा आनंद, समाधान, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळेल. डॉक्टरांकडे उपचार करून रुग्ण समाधानाने घरी जातो. वैद्यकीय पेशातून समाजाला काही तरी चांगले देऊ शकता. चांगल्या समाजनिर्मितीस तो एक हातभार लागेल. या उद्देशाने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत (दि. 19 ऑक्टोबर 2021) बाणेर येथिल ब्युडेंन्ट क्लिनिकमध्ये येणा-या सर्व महिला रुग्णांसाठी तपासणी फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. अंकिता नगराणी यांनी दिली.
आमच्या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक लेसर उपकरणे वापरुन रुट कॅनल उपचार प्रणाली, सर्जरी करून अक्कलदाढ काढणे, इम्प्लांट बसवणे, हिरड्यांची सर्जरी, दाताचा कॅन्सर, दंत सौंदर्यशास्त्र, जबड्यांची सर्जरी, कृत्रिम दंत शास्त्र, वेडेवाकडे दात सरळ करणे अशा विविध प्रकारचे उपचार उपलब्ध असल्याचेही डॉ. अंकिता नगराणी यांनी सांगितले. डॉ. अंकिता नागराणी या आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड व अपोलो हॉस्पिटल येथे कॉन्सल्टिंग डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.————————-अधिक माहितीसाठी संपर्क : विनायक कुलकर्णी — 7447777311.———————–