प्राणी संग्रालय नूतनिकरणाच्या नावावर 20 कोटीचे वाटोळे,भाजपच्या नाकर्त्या कारभाराची आमदार महेश लांडगे कडून पाठराखण:माजी महापौर मंगला कदम

निवडणूक जवळ आल्याने आमदारांना प्राणीप्रेमींचा पुळका. नूतनिकरणाच्या नावावर 20 कोटीचे वाटोळे,भाजपच्या नाकर्त्या कारभाराची आमदारांकडून पाठराखण. मंगला कदम
पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय शहरातील नागरीकांच्या सोईसाठी २० वर्षापासून कार्यरत आहे.मनपाच्या सार्वत्रिक निवडणूका आल्यात त्यामुळे शहरातील नागरीकांना, प्राणी प्रेमींना या संग्रहालयाबाबत आपण किती जागरुक आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार महेश लांडगे करीत आहेत नुतनीकरणाचे काम भाजपच्या सत्ताकाळातच रखडले असल्याचा आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी केला
. नुतनीकरणाचे काम भाजपच्या काळातच रखडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या नाकर्त्या कारभाराची एकप्रकारे कबुलीच दिली आहे. भाजपच्या काळात या संग्रहालयाच्या नुतनीकरणाच्या कामाची वाट लावून २० कोटी रुपयांचे नुकसान आमदार आणी अधिकारी यांनी केले आहे
प्राणी संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम सन २०१६ पासून सुरु आहे, २०१६ रोजी पहिली निविदा र.रु. १४ कोटी ची काढण्यात आली त्यानंतर दुसरी निविदा सन २०१९ रोजी र.रु. ५ कोटी ८२ लाखा ३२ हजार ची काढण्यात आली.. मागील सहा वर्षापासून नुतनीकरणाचे काम सुरुच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांसाठी संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय अजून बंदच आहे. त्यामुळे शहरातील निसर्गप्रेमी व प्राणीप्रेमीमध्ये नाराजीचा सुर आहे सदरचे नुतनीकरणाचे काम भाजपच्या सत्ताकाळातच रखडले असल्याचा आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी केला आहे.
शहरात जखमी अवस्थेत सापडणारे पक्षी, प्राणी उपचारासाठी या संग्रहायात नागरीक व पशू व पक्षांसाठी काम करणा-या विविध संस्था दाखल करतात. या प्राणी संग्रहालयातील पशू वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करुन ते परत निसर्गांत सोडतात.
मागील पाच वर्षापासून या प्राणी संग्रहालयाच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या वेळोवेळी तक्रारी येत आहेत. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या होणा-या निष्काळजीपणाबाबत दूर करण्यात यावा
अजगर चोरी प्रकरण, वर्ल्ड फॉर नेचरच्या वन्यजीव संरक्षकाने बोनेलीचा गरुड जखमी अवस्थेत संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केला होता.
त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होऊन तो परत निसर्गांत सोडून देणे अपेक्षित होते. परंतु त्याच्यांवर जुजबी उपचार करण्यात येऊन १० ते १५ दिवसांनी त्याला जखमी अवस्थेमध्येच दुर्गा देवी टेकडीच्या उद्यानात सोडून देण्यात आले.
या संस्थेच्या वन्यजीव संरक्षकांनी त्या अशक्त व उडता न येणा-या गुरुडाला ताब्यात घेऊन पुणे येथील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले
त्याच्या पंखाला फ्रँक्चर असून त्याच्या उपचारासाठी २० ते २५ दिवस लागतील असे तेथील पशुवैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. वन्यजीव अधिनियम १९७२, शेड्युल २ च्या या प्राण्यांबाबत मनपाच्या संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयातील पशूवैद्यकीय अधिका-यांनी केलेला निष्काळजीपणामुळे दुर्मिळ पक्षाच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता.
.