अभिनेत्री नोरा फतेही हिला ED चे समन्स 200 कोटींच्या फसवणूकी प्रकरणी

मुंबई : 200 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिला समन्स बजावले आहे. अनेक कलाकारांना फसवण्याचा प्रयत्न करणारा सुकेश चंद्र शेखर याच्या केस संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे

सुकेश चंद्र शेखर याच्यावर एका व्यावसायिकाची 200 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. लीना पॉल ही सुकेशची कथित पत्नी त्याला या कामासाठी मदत करत असल्याचं समोर आलं आहे

सुकेशने नोराला फसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ईडी नोराची चौकशी करणार आहे. सुकेशवर नोरासोबतच जॅकलिन फर्नांडीसलाही फसवल्याचा आरोप आहे. त्यामुळे जॅकलिनलाही चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे. याआधी एकदा ईडीने याप्रकरणी जॅकलिनला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी तिने सुकेशने केलेल्या फसवणूकीबद्दल ईडीला माहिती दिली होती

. लीना पॉल या सुकेशच्या कथित पत्नीच्या मदतीने सुकेश अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फसवत होता.

सुकेश जेलमध्ये असतानाही तो लीनाच्या मदतीने अनेकांची फसवणूक करत होता. यावेळी लीना पॉल हिने याप्रकरणात सहभागी असणाऱ्या इतरही दोन जणांची माहिती पोलिसांना दिली होती. सुधीर आणि जोएल या दोघांनी सुकेशला फसवणूकीतले पैसे लपवण्यासाठी मदत केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

याआधी जॅकलीन हिची साक्षीदार म्हणून याप्रकरणी ईडीने चौकशी झाली होती. नवी दिल्लीत ईडीने जॅकलिन हिची जवळजवळ 6 तास चौकशी केली होती. आता नोरा फतेहीसोबतच तिलाही ईडीच्या चौकशीला पुन्हा एकदा हजर राहावं लागणार आहे.

ईडीने गुरुवारी म्हणजे आज नोराला चौकशीसाठी बोलावलं आहे. तर उद्या जॅकलिनची एमटीएनएल येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे.

Latest News