विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आधुनिक नवदुर्गाचा आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित

पिंपरी(प्रतिनिधी ) नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवदुर्गांचा (महिलांचा ) प्रतिनीधीक स्वरूपात आमदार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गाना सन्मानित करत त्यांच्या कार्याचे कौतुक देखील यावेळी करण्यात आले. यामध्ये महिला वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या डॉक्टर, परिचारिका, महिला वाहतूक पोलीस, रिक्षाचालक महिला, शिक्षक महिला, पीएमपीएल वाहन चालक महिला, सफाई कर्मचारी महिला, सुरक्षा रक्षक महिला, पत्रकार महिला आदी नवदुर्गांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते. नवदुर्गा याचं खास वैशिष्ट्य…
झालेल्या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून, स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करत असते ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो त्यामुळे आज हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचा विशेष आनंद होत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे कार्य खरचं कौतुकास्पद आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आजपासून आम्ही जोमाने समाजातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू अशी शपथ या नवदुर्गांच्या प्रतिनिधीनी घेतली .
यावेळी महिला डॉक्टर, डॉ. छाया शिंदे , अधिपरिचारिका सौ. भाग्यश्री पवार , महिला वाहतूक पोलीस सौ सुरेखा काळे , रिक्षाचालक महिला सौ.रोहिणी दुरगव , शिक्षक महिला सौ. नीलिमा मोरे , पीएमपीएल वाहन चालक महिला हेमलता पाडाळे , सफाई कर्मचारी महिला सौ. गोजाबाई गावडे , सुरक्षा रक्षक महिला सौ. कल्पना आढाव , पत्रकार महिला सौ. शबनम सय्यद , रिक्षा चालक सौ. कोमल ओव्हाळ . आदी नवदुर्गा प्रतिनिधींनी उपस्थित राहून सन्मान स्वीकारला