सावित्रीबाई फुले विद्यापीठानेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर करणार

Savitribai-Phule-Pune-Unive

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी नियमावली जाहीर केली आहे. नेही महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर केलीय. मात्र, यात सुस्पष्टता नसल्यामुळे विद्यापीठाशी सलग्न असलेल्या महाविद्यालयांनी सविस्तर नियमावलीची मागणी केली

मुंबई विद्यापीठाने नियमावली जाहीर केली असून 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानेही महाविद्यालयांसाठी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरवले जाणार नाहीत, तर फक्त प्रात्यक्षिके होणार आहे. य. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील महाविद्यालये येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याती महत्त्वाची घोषणा केली

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालये 12 ऑक्टोबरपासून सुरु होतील, असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांमधील संग्रमावस्था आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला. कारण, महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भांत अधिकृत पत्र आमच्या विभागानं दिलं नाही, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला होता.

Latest News