तामिळनाडू मध्ये मंदिरातील 2138 किलो सोने वितळवण्याची सरकारची तयारी

चेन्नई : तामिळनाडूचे एमके स्टालिन सरकार राज्यातील मंदिरातील सुमारे 2138 किलो सोने वितळवण्याची तयारी करत आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने याला बेकायदेशीर म्हटले आहे. त्या सरकारच्या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे

, सरकारचा आदेश केवळ हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी कायदा, प्राचीन स्मारके कायदा, रत्न नियम इत्यादींचे उल्लंघन करत नाही तर, उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात आहे, असे याचिकाकर्ते  एव्ही गोपाला कृष्णन आणि एमके सर्वनन यांनी म्हटले आहे. परंतु, राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवाऱ्यात अडकला आहे, असा दावा द्रमुक सरकारने केला आहे

वितळवून त्याचे सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर करण्याचा अधिकार आहे. ही प्रक्रिया गेल्या 50 वर्षांपासून सुरू आहे.

मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याचे योग्य ऑडिट न करता घाईत पाऊल उचलणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत

उच्च न्यायालयाने याच वर्षी 7 जून रोजी मंदिराच्या मालमत्तांचे मूल्यांकन आणि त्याची नोंद करण्याचे आदेश दिले होते. राज्यात गेल्या 60 वर्षांपासून असे करण्यात आले नाही, असेही न्यायलयाने त्यावेळी म्हटले होते. राज्य सरकारने योग्य पद्धतीने ऑडिट करण्याऐवजी देवतांना सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याचे दागिने आणि इतर वस्तुंना वितळण्याची घोषणा केली

. या दागिन्यांचे आणि वस्तुंचे वजन 2138 किलो इतके आहे,सरकार लोकांची दिशाभूल करण्यासाठी सोन्याच्या ऑडिट बाबत बोलत आहे. एका दिवसात 2 मंदिरांचे ऑडिट करण्याचे राज्य सरकारने लक्ष्य ठेवले आहे

. परंतु, मंदिरात वर्षानुवर्षे साठलेल्या मालमत्तेचे दोन दिवसांत मूल्यांकन करणे अशक्य आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडे या . या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

Latest News