इंधनाच्या किंमतीमुळे मोदी सरकारची दिवाळी….

नवीदिल्ली : एक्साईज ड्युटीमधून सरकारला एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये एक लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर गच्च भरल्याचं स्पष्ट होत आहे. सहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात भर पडली असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्येच एक्साईज ड्युटीच्या महसूलात तब्बल 48 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे

. गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेल्या इंधनाच्या किंमतीमुळे सर्वसामान्य माणूस मेताकुटीला आला असतानाच दररोज इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता एकीकडे सर्वसामान्यांचं महागाईमुळे दिवाळं निघत असताना मात्र, केंद्र सरकारची दिवाळी साजरी होणार असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे

आता तरी सरकार इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मागच्या वर्षी 67 हजार 195 कोटी रुपये एक्साइज ड्यूटीमधून केंद्र सरकारला मिळाले होते. यावर्षी हा आकडा 1 लाख कोटींपेक्षा अधिक असल्याने इंधनामधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे

. त्यातच गेल्या सहा महिन्यात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ही दरवाढ कधी थांबणार?, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

Latest News