युतीमध्ये आम्ही 25 वर्षे अंडी उबवली: मुख्यमंत्री ठाकरे
बारामती : “युतीमध्ये आम्ही २५ वर्षे अंडी उबवली. फटाके उडवा. आवाज येऊ द्या; पण धूर काढू नका”, असाही खोचक सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नवाब मलिक आणि भाजप, समीर वानखेडे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस नवे वळण घेताना दिसत आहे.इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी भाजपबरोबरच्या २५ वर्षांच्या युतीवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की,
आता या विषयावर मुख्यमंत्री म्हणाले, “पवार कुटुंब विकासात गुंतलं आहे. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणले जात आहेत. हे आपल्या संस्कृतीचं लक्षण नाही. विघ्नसंतोषी मंडळी खूप आहेत. त्यांना चांगल्या कामात अडथळे आणून काय मिळतं? चांगल्या कामाच्या आड मी येणार नाही”, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती मांडलं.
“मी कोणत्याही महिलेवर आरोप केला नाही. दोन्ही महिलांना उल्लेख यासाठी आला की, त्यांचा या प्रकरणात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी अजित पाटील, संजय राऊत, एकनाथ खडसे, यांच्या घरातील महिलांवरदेखील आरोप केला. त्यांच्या घरातील महिला आणि इतरांच्या घरातील महिला नाहीत का? देवेंद्र फडणवीस तुमचा नियटवर्तीय समीर वानखेडे आहेत, त्यांच्याकरवी माझा तपास करा. माझ्या जावयाच्या घरातून कोणतंही ड्रग्ज जप्त करण्यात आला नाही. हवंतर त्याचा पंचनामादेखील देतो. मी कोणतेही हवेत आरोप करत नाही”, असं प्रत्युत्तर मलिकांनी फडणवीसांना दिलं आहे
. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कुणीच सिद्ध करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना मला अटक का केली नाही? त्यामुळे बाॅम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट पाहू नका. पंचतारांकीत हाॅटेलमध्ये आयोजित पार्टी तुम्हाला दिलस्या नाहीत का? एका टेबलची किंमत १५ लाख रुपये होते. सॅम डिसुझा, फ्लेचर पटेल, मनीष भानुशाली, के. पी. गोसावी यांना घेऊन समीर वानखेडे मुंबईत येताच ‘प्रायव्हेट आर्मी’ उभी केली. या आर्मीन कोट्यवधींची वसुली केली.
वानखेडे यांनी मालदिवमध्ये वसुली केली.”“समीर वानखेडे हे ७० हजारांचा शर्ट वापरतात. लाखो रुपयांचं घड्याळ घालतात. १ लाखाची पॅन्ट वापरतात. २ लाखांचे बूट वापरतात, इतके प्रामाणिक अधिकारी आहेत. जेएनपीटी बंरदावर १५ दिवसांपासून ५१ टन पडून आहे, पण कारवाई नाही.
अनिल देशमुखांदेखील फसविण्यात आलं आहे. राजकीय सुडापोटी त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नेत्यांना घाबरविण्यासाठी केल्या जात आहेत. परबवीर सिंगांना कुठं आहेत. जाणीवपूर्वक त्यांना देशातून बाहेर पडण्यास मदत करण्यात आली. याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल”, अशीही माहिती त्यांनी माध्यमांना दिली. ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत होते. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशिर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत मलिकांवर हल्लाबोल केला.