माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी…

मुंबई : मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. आज ईडीने त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या वसुलीसाठी सचिन वाझेची नियुक्ती केली होती. त्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता. देशमुख यांच्या घरावर ईडी आणि सीबीआयने अनेकदा छापे टाकले होते. मात्र, देशमुख पसार होते. बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याने त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली
. तत्पुर्वी त्यांची १३ तास चौकशी करण्यात आली.संबंधि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोपाखाली ईडीच्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. Anil Deshmukh arrest देशमुख यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर ईडीने सोमवारी अटक केली होती.अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले.
त्यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आली. .
परमबीर यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला. याच आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन ईडीनेही तपास सुरू केला. ईडीने यापूर्वी देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे
. रविवारी बदल्यांसाठी देशमुखांचा मध्यस्थ म्हणून काम करणारा संतोष शंकर जगतापलाही अटक झाली. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हे आहेत कुठे, असा सवालही देशमुख यांनी केला आहे. आपली बाजू मांडणारा त्यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. ते म्हणाले, मला जेव्हा ‘ईडी’चा समन्स आले तेव्हा मी ‘ईडी’ला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा मला ‘ईडी’चा समन्स आले तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवले की, माझी याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे