आर्यन खानची तपास, दिल्ली एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या हाती

मुंबई : आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले.आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरीनंतर आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला.या निर्णयानंतर दिल्ली एनसीबीकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. दिल्ली एनसीबीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कोणत्याही अधिकाऱ्याला तपासावरून हटवण्यात आलं नाही. त्यामुळे समीर वानखेडेसह त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी या तपासाचा भाग असतील पण त्यांना संजय सिंगच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
फक्त आर्यन खान प्रकरणच नाही तर नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणासह एकूण 6 प्रकरणाच्या तपासाचं नेतृत्व समीर वानखेडे करत होते. पण या प्रकरणांच्या तपासाची धुरा आता दिल्ली एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला रोज वेगवेगळं वळण लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मला या तपासावरून वगळण्यात आलेलं नाही, या प्रकरणाचा तपास कोणत्यातरी केंद्रीय एजन्सी मार्फत व्हावा अशी याचिका मी न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार दिल्ली एनसीबीची एसआयटी टीम या प्रकरणांचा तपास करणार असल्याची माहिती समीर वानखेडेंनी बोलताना दिली