महापालिकेत 2022 ला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकच “जिंकणार ! ! आमदार लक्ष्मण जगताप चा दावा

बारामतीकारांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा इशारा महापालिकेत 2022 ला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकच “जिंकणार ! ! आमदार लक्ष्मण जगताप चा दावा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे शहरात निवडूकीचे वातावरण गरम होण्यास सुरूवात झाली आहे त्यातच काल राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात सर्व पक्षीय कार्यकर्ते नगरसेवक आमदार यांनी उपस्तितीत होते या वेळी भाजप लक्ष्मण जगताप यांनी ही निवडणूक शहरातील जनताच जिंकणार असल्याचा दावा करुण त्यांनी परत एकदा बारामतीकारांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा इशाराच कोणाचेही नाव न घेता दिला आहे
राज्यात आणी केंद्रात कोणत्याही पक्षांची सरकार असुदयात मात्र पिंपरी त मात्र आमच्याच शहरातील नागरिकांची सत्ता सरकार येणार असल्याचा दावा केला आहे
तर दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांनी शहरांत राष्ट्रवादी काँग्रेस ला 80 जागा मिळतील असे भाकीत केलं आहे त्यातच महापालिकेच्या तिजोरीवर भाजपाने करोडो रूपयावर डल्ला मारला आहे त्यामुळे शहरातील नागरिक भाजपाला वैतागले आहेत. कोणतेही विकास कामे भाजपाने गेल्या पाच वर्षांत केली नाहीत असा दावाही माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे
भाजपच्या मनमांनी कारभाराला, हुकूमशाहीला , नागरिक वैतागले असून या शहराचा विकास हा खऱ्या अर्थाने शरद पवार, अजीत पवार यांनीच केला आहे. तसेच शहराचे नाव देशपांतळीवर पोहचवले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते आझाभाई पानसरे यांनी व्यक्त केले
पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या तर्फे आज काळभोरनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात सर्वपक्षीय ” दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक विजय शिंदे, शैलेश मोरे व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे अनेक आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लक्षण जगताप म्हणाले की येणारी पिंपरी महापालिका निवडणूक ” पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक जिंकणार असा दावा केला आहे .