एसटीची पुणे विभागातील वाहतूक शंभर टक्के बंद ?

काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटीच्या राज्यव्यापी आंदोलनाचा फटका राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना बसत आहे. रविवारी एसटीच्या पुणे विभागातील राजगुरूनगर, नारायणगाव आणि इंदापूर डेपोतील कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे पुणे विभागातील एसटीच्या वाहतूकीवर परिणाम झाला. पुणे विभागातील एसटीची सर्वच स्थानके प्रवाशांच्या गर्दीने गच्च झाली होती.

पुणे विभागातील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची आंदोलनाबाबत रविवारी दुपारी पुण्यात बैठक सुरू होती. यावेळी सर्वच कर्मचार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर किंवा एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत एसटीची पुणे विभातील वाहतूक बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे

.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी (दि. 07) रोजी रात्री बारा वाजल्यापासून पुणे विभागातील कर्मचारी संप पुकारणार आहेत. त्यानुसार पुणे विभागातील एसटीच्या सर्व गाड्या जागेवरच उभ्या राहणार आहेत. रविवारी सर्वच कर्मचारी आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत. उद्याचा एसटी शंभर टक्के बंद राहणारकर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचा फटका राज्यभरात असलेल्या एसटीच्या विविध विभागात बसत असून, आता एसटीच्या पुणे विभागालाही या आंदोलनाचा फटका बसणार आहे.

एसटीचे पुणे विभागातील कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आंदोलनाच्या तयारीला लागले असून, आजपासूनच म्हणजेच रविवारी (दि.07) रोजी रात्री बारानंतर एसटीची पुणे विभागातील वाहतूक शंभर टक्के बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Latest News