संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान, पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा :राष्ट्रवादी युवक
मुंबई : पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीमती कंगना राणावत यांचे पाय जमिनीवर नाहीत.. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केल्याचे पत्रात म्हटले आहे. कंगना म्हणाल्या की, ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते त्यामुळे त्यांनी भारताचा अवमान केला आहे . त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे
त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,
, कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे 8 नोव्हेंबर 2021 रोजी कंगना राणावत यांचा आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता श्रीमती कंगना राणावत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात.
सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केला. त्यामुळे तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली आहे.
1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा.
– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस