भाजपला महाराष्ट्राच्या शांततेला आणि स्थिरतेला चुड लावायची -संजय राऊत
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्या भाजपच्या हातचे बाहुले बनू नका. कर्मचाऱ्यांनी स्वत:च हित पाहावं राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. .भाजपला महाराष्ट्राच्या शांततेला आणि स्थिरतेला चुड लावायची आहे. त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत, असा घणाघात केला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे
एसटी कर्मचाऱ्यांना भाजपच्या हाताचे बाहुले बनू नका असं आवाहन देखील केलं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या शातंतेला चुड लावायचं ठरवलं आहे. त्यांना कर्मचाऱ्यांशी काहिही घेणंदेण नाही. एसटीचं विलनीकरण राज्य सरकारमध्ये करणं शक्य नाही, असं स्वत: भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले आहेत.
. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपला चांगलं धारेवर धरलं आहे. भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांचा माध्यमातून आपलं राजकारण साधत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या घराच्या होळ्या करायचं ठरवलं आहे, अशी टीका त्यांनी केलीये.मात्र तरीही आता भाजपमधील हौशे, गवशे उपरे नाचत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला