पुण्यात ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजारांची रोकड चोरट्याने पळवली
बाबत ६१ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बुधवार पेठ परिसरात राहतात. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ते बँकेतून घरी निघाले होते. त्यांच्याकडील पिशवीत ५० हजारांची रोकड आणि मुदत ठेवीची कागदपत्रे होती.
बाजीराव रस्त्यावरील हुजूरपागा शाळेसमोरील पीएमपी थांब्याजवळ एक व्यक्ती पाठीमागून आली. त्या व्यक्तीने त्यांच्या हातामधील पिशवी हिसकावली. ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरडा केला. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.
बाजीराव रस्त्यावरील हुजूरपागा शाळेजवळील पीएमपी स्थानकाजवळ ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजारांची रोकड आणि कागदपत्रे असलेली पिशवी चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी विश्रामाबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसमधून लांबवला ऐवज विमानगर चौक परिसरात खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या पिशवीतून दागिने, कपडे, रोकड असा ९२ हजारांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मुंदडा (वय २७, रा. वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली आहे. मुंदडा आणि त्याचे नातेवाइक जालन्याहून खासगी प्रवासी बसने पुण्यात आले. विमाननगर चौकात बसमधून ते उतरले. त्या वेळी मुंदडा यांनी पिशवीची पाहणी केली. त्या वेळी पिशवीतून रोकड, मंगळसूत्र, कपडे असा ऐवज लांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी फौजदार अविनाश शेवाळे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात मोटारीची काच फोडून पिशवीत ठेवलेली पाच लाखांची रोकड चोरट्याने लांबविण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर तुपे (वय २६, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तुपे व्यावसायिक आहेत. गुरुवारी दुपारी ते मोटारीतून लोणी काळभोर परिसरात गेले होते. त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यावरील शिवतारा मॉलसमोर मोटार लावली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्याने मोटारीची काच फोडली आणि पिशवीत ठेवलेली पाच लाखांची रोकड लांबविली. तुपे काही वेळानंतर मोटारीजवळ आले. त्या वेळी मोटारीची काच फोडून पिशवीतून रोकड लांबविल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे तपास करत आहेत.