वाल्हेकरवाडी येथे संविधान सन्मान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन – नामदेव ढाके

तसेच, सन्मान संविधानाचा, भीम गीतांचा कार्यक्रम देखील घेण्यात आले. भारतीय संविधानाप्रती तरुण पिढीमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संविधान प्रास्तविका वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १७ मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभागाच्या माजी अध्यक्षा करुणाताई चिंचवडे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, उपस्थित होते. देशभरात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले होते. परंतु, कोरोना काळातील निर्बंधामुळे गेल्या वर्षी संविधान दिवस साजरा करता आला नाही.
यावर्षी राष्ट्रपतींनी संविधान प्रास्ताविका वाचन करून संविधान दिनाची सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून संविधान सन्मान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान तयार केले आणि त्याच संविधानावरील मुल्यांचे आधारावर संपुर्ण देशात लोकशाही पद्धतीने समान अधिकार, व्यक्तीगत विचार, आचार, विश्वास यामुळेच जगभरात भारताचे संविधानाची एक वेगळी ओळख असल्याचे सत्तारुढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रसंगी, उपस्थित नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला. तसेच, ऐकमेकांना संविधान सन्मान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ,