सुहृद खुला मंच ‘, पुस्तक कट्टयाचे आज उद्घाटन…

.इमारतींची टेरेस धूळ खात पडून न राहता तेथे सांस्कृतिक कट्टे, वाय फाय झोन, टेरेस गार्डन अशा सुविधा निर्माण कराव्यात ,अशी गंगोत्री होम्सची संकल्पना आहे. ‘ सुह्रद खुला मंच ‘ याच संकल्पनेतून तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन अभिनेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
घर आणि नात्यांवर आधारित डॉ. माधवी वैद्य निर्मित ‘रंग संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. शर्वरी जमेनीस, धीरेश जोशी त्यात सहभागी होणार आहेत. ‘ पुस्तक कट्टयाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.गृहबांधणी विषयक प्रदर्शन सकाळी 10 पासून सायंकाळी ९ पर्यंत मनोहर मंगल कार्यालय येथे सुरू असणार आहे
.वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे . त्या अंतर्गत हे कार्यक्रम होत आहेत……………………………….