कृषी कायदे मागे घेण्याबाबतचे रिपील विधेयक मंजूर………

पुणे : काँग्रेस, तृणमूल तसेच डाव्या पक्षांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव देण्यात आला होता. तथापि अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, असे आम्ही आधीच सांगितले होते. त्यानुसार सरकारने आज हे कायदे मागे घेण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. पण कोणत्याही चर्चेशिवाय ही रिपील विधेयके मंजूर करण्यात आली, हे दुर्दैवास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली.
कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. संसदेचे हे सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून ते म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने देशाच्या विविध भागात रचनात्मक, सकारात्मक, जनहिताचे व राष्ट्रहिताचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. नुकताच देशाने संविधान दिवसदेखील साजरा केलेला आहे. अशावेळी होत असलेले संसदेचे हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोणी किती जोर लावून संसदेचे कामकाज थांबविले, यापेक्षा विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेऊन किती चांगले योगदान दिले, यावर संसद कामकाजाचे मूल्यमापन व्हावे. हिवाळी अधिवेशनात सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार बांधील आहे, असेही मोदी म्हणाले.
गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. शून्य प्रहरात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी कृषी कायदे मागे घेण्याबाबतच्या विधेयकावर आम्हाला बोलायचे आहे; पण तशी संधी दिली जात नसल्याचा आरोप केला. सदनात नियम धाब्यावर बसविले जात असून सरकार ठोकशाहीचा अवलंब करत असल्याचे ते म्हणाले.