छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी करा…. डॉ. कैलास कदम

IMG-20211223-WA0234

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी करा…. डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. 23 डिसेंबर 2021) छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम भारतीयांचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची कर्नाटक मध्ये विटंबना करणाऱ्यात आली. या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. असे निंदनीय कृत्य करणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही काँग्रेसच्यावतीने करीत आहोत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल ज्येष्ठ नेते लक्ष्मण रुपनर, आबा खराडे, इस्माईल संगम, ज्ञानेश्वर मलशेट्टी, संभाजी मुळीक, तारीक रिजवी, जुबेर खान, के. हरी नारायणन, सुप्रिया पोहरे, उमेश खंदारे, किरण नढे, कौस्तुभ नवले, हरीश डोळस, विशाल सरवदे, संदीप शिंदे, विश्वनाथ जगताप, जेवियर अँथोनी, दिनकर भालेकर, हिराचंद जाधव, रोहित तिकोने प्रवीण जाधव, लक्ष्मण तुळसे, सुरेंद्र पासलकर, मारुती लोखंडे, विजय पाटील, आर. एल. जाधव, संतोष ढोरे, प्रवीण नांगरे, मिलिंद फडतरे, छायावती देसले, भारती घाग आदी उपस्थित होते.
यावेळी एचए कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर पुणे मुंबई महामार्गावर भाजप सरकारच्या विरोधी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महिलांनी बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी कवीचंद भाट, नरेंद्र बनसोडे, तारीक रिजवी, संभाजी मुळीक, छायावती देसले देसले यांनीही या घटनेचा निषेध करणारे भाषण केले.

……………………………………………………

Latest News