पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद,कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजन


पिंपळे गुरव येथील कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजन
पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले.
यावेळी कीर्तन महोत्सवाचे मुख्य संयोजक विजय (आण्णा) जगताप, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प. जोपाशेठ पवार, माजी महापौर शकुंतला धराडे, ह.भ.प. शितोळे महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त प्रा. शिवाजीराव मोहिते, ह.भ.प. वांजळे महाराज, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शिवाजीराव पवार, ह.भ.प. रघु महाराज शिंदे, जनार्दन कवडे, खडसे काका, सुदाम ढोरे, धुमाळ मामा, जगन्नाथ नाटक पाटील, मोहिते ताई, दत्ताभाऊ चिंचवडे, उद्योजक संजय भिसे, कमलाकर जाधव, माऊली आढाव, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, उद्योजक प्रशांत फड, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड व ह.भ.प. अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते.
हा कीर्तन सोहळा 24 ते 26 डिसेंबर असे तीन दिवस पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे.
शिवानंद स्वामी महाराज व ह.भ.प. यांनी कीर्तन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
ह.भ.प.विशाल महाराज खोले यांनी आपल्या कीर्तनात निरूपण केले, की माणसांनी स्वल्प संतुष्ट असणं गरजेचं आहे. ही वृत्ती आज राहिलेली नाही. संतुष्ट होणारे महात्मे असतात. देवाची साधना करणारा भक्त हा देहभान विसरून भक्त झाला पाहिजे. ते निष्ठावंत असावेत. शूर सैनिकही असावा. कुत्र्यामध्ये आपल्या मालकाप्रती इमानदारीने वागण्याची वृत्ती असती. अगदी तीच वृत्ती भक्तांमध्ये असावी.
ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेत सांगितले, की वाढत्या मोबाईल वापरामुळे तरुण पिढी वाचनाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. संतसाहित्य ही वाचले जास्त नाही. आपले सण, उत्सव, परंपरा याकडेही दुर्लक्ष होताना दिसते आहे. आपण जीवनात काय कमावले याचा जास्त विचार करणे गरजेचे आहे. जीवनात वेदना सहन केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे मोहमाया याच्या आहारी न जाता माणसाने जीवन जगले पाहिजे.