परीक्षा घोटाळा प्रकरण : पुणे पोलीस सक्षम तपास योग्य दिशेने सुरु.: उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे:: सीबीआयला भरपूर कामं आहेत.महाराष्ट्रातील आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त करण्यात येत आहे. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी ( व्हायलाच हवी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.
आपले पोलीस सक्षमपणे काम करते. याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झालं? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असं पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये.
काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. मग या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.
सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी देवेंद्र फडवणीस यांनी केली