लोकशाही मार्गाने सत्तेत आल्यावर हुकुमशाही अंमलात आणली तर जनशक्ती एकवटते:शरद पवार

पुणे; लोकशाही मार्गाने सत्तेत आल्यावर हुकुमशाही अंमलात आणली तर जनशक्ती एकवटते आणि अशा सत्तेला पायउतार व्हावे लागते असा जगाचा इतिहास आहे. भारतात सध्याच्या सरकारने शेतकरी अडचणीत आणणारे कायदे आणले. त्यावर कोणत्याही सभागृहात किंवा शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा घडवून आणली नाही. परिणामी शेतकरी एकवटले. वर्षभर लढा दिला. अनेकाना प्राण गमवावे लागले. त्यानंतर ३ कायदे मागे घ्यावे लागण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली. अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली
खेड तालुक्याचे माजी आमदार साहेबराव तथा आप्पासाहेब सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, जीवनपट चित्रफीत प्रकाशन तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारीत नूतन इमारतीचे भूमिपूजन खासदार पवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. त्यानंतर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधीत करताना पवार बोलत होते
. खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणें, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक संजय काळे,खेड बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, रुपाली चाकणकर, पंचायत समिती सभापती अरुण चौधरी,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे,नानासाहेब टाकळकर, हरिभाऊ सांडभोर, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यावेळी उपस्थित होते.
.खासदार पवार पुढे म्हणाले,देशातील शेतकऱ्यांची सध्याची अवस्था वाईट आहे. ही अवस्था बदलायची असेल तर त्याची आर्थिक गुंतवणूक क्षमता वाढवली पाहिजे. आपण कृषीमंत्री असतांना म्हणूनच ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. पुण्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातुन १८०० कोटी रुपये शून्य टक्के दराने दिले जातात. याकडे केंद्राने लक्ष द्यावे, असे पवार म्हणाले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर यांनी सर्वांचे स्वागत केले.डॉ प्रकाश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.खेडचे माजी आमदार साहेबराव सातकर सहकारातील मोठे व ज्येष्ठ नेते होते. ज्या काळात शेतक-याच्या पारंपारिक साधनातून बाहेर काढून नव्या युगात आणायचे होते. त्या काळात सहकार चळवळीचे जाळे तयार करण्यासाठी साहेबराव सातकरानी दिशादर्शक काम केले. त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा आदर्श पुढे चालवावा असे शरद पवार यांनी सांगितले.
खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. उलट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी नामोल्लेख टाळून मोहिते यांनी वडील माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपांची जाहीर वाच्यता केली. यावर शरद पवार काहीही बोलले नाही. याशिवाय देवेंद्र बुट्टे पाटील हे खेड तालुक्यातील सुसंस्कृत व भावी नेतृत्व असल्याचा उल्लेख खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला
.शैक्षणिक संस्थानी पारंपारिक ऐवजी तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण देण्याचा सध्याचा काळ आहे. ज्या भागात अशांतता पसरते तिथे प्रगतीला खिळ बसते. त्यातून अराजकता उदयाला येते. अलीकडे स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ‘शक्ती’ कायदा आणला आहे. याद्वारे कडक शिक्षा किंवा फाशीची शिक्षा होणार आहे,