बाल मेळाव्यात रमले बालचमू बालमेळाव्यात बच्चे कंपनीने लुटला मनसोक्त आनंद बोपोडीत बालमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न


बाल मेळाव्यात रमले बालचमू
बालमेळाव्यात बच्चे कंपनीने लुटला मनसोक्त आनंद
बोपोडीत बालमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे : गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात मुलांचे बालपण हरवून गेले होतेच आणि विविध खेळापासून दूर गेल्यामुळे हसू ही हरपून गेले होते, हेच बालपण आणि चेहर्यावर हसू परत आणण्यासाठी बोपोडी येथे बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या बालमेळाव्यात बालचमू व मोठ्यांनी दिलखुलास आनंद लुटला.विविध खेळण्यांचाआस्वाद घेत बालचमू अत्यंत आनंदी वातावरणात वावरताना दिसत होते.
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या 136 व्या वर्धापन दिनानिमित्त व नाताळ सणाऔचित्य साधून बोपोडी येथे शनिवार 25 डिसेंबर 2021 रोजी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद रणपिसे यांच्यावतीने बालमुळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. बालमेळाव्याचे शुभारंभ माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कांग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष मनिष आनंद, राजेद्र भुतडा, रमेश पवळे, नंदलाल धिवार, सुंदराताई ओव्हाळ,चंदाताई ढोणे, इंद्रजित भालेराव, साजिद शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्व मुलांना खाऊ आणि ख्रिसमस टोपी भेट देण्यात आली. बालमेळाव्यात पाळणा, जंपींग, ट्रेन, बोटींग, बलून शुटींग, घोडा व उंट सवारी, धुम गाडी, घोडा बग्गी, कपबशी राईड, टंटू आदी मोफत ठेवण्यात आले होते ज्याचा खर्या अर्थाने मुलांनी स्वतःचा दिवस आनंदात साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोदाई सोशल फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभलेबाल मेळाव्यात रमले बालचमूबालमेळाव्यात बच्चे कंं