राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 2 जानेवारी, 2022 रोजी पूर्व परीक्षा होणार होती तर मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार होती. या परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होतेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी २ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

२जानेवारी रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वाढीव सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा होणार होती.

Latest News