शासन स्तरावरुन प्रथमच संपन्न होणार, कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन प्रशासनाकडुन नियोजन अंतिम टप्यात !

सुरक्षेच्या दुष्टीने महत्वपुर्ण उपाययोजना ! २२ ठिकाणी पार्किंग , २६० बसेस ची व्यवस्था.
पुणे- शौर्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन निमित्त अभिवादन कार्यक्रम होत आहे. शासनस्तरावरुन प्रथमच सदर कार्यक्रमाची नियोजन करण्यात येत आहे शासन निर्णयाद्वारे समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नियंत्रणाखाली तात्पुरती प्रशासकीय समिती गठित केली आहे. सदर समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वत्तीने करण्यात येत असलेले नियोजन अंतिम ट्प्यात आले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व [प्रशिक्षन संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडुन नियोजन करण्यात येत आहे. त्यासदर्भात विविध बैठकातुन आयुक्त, समाज कल्याण व जिल्हाधिकारी पुणे यांनी आढावा घेत सुक्ष्म नियोजन केले आहे.
पुणे-अहमदनगर महामार्गावर वाहतुककोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेबर ते १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यत वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहे.पुण्याहुन नगरकडे जाणारी जड वाहतुक खराडी बायपास येथून हडपसर,पुणे-सोलापुर हायवेने केडगाव चुफुला.न्हावरा,शिरुर मार्गे नगर कडे जातील.
सोलापुर रत्यावरुन आळंदी,चाकण या भागात जाणारी जड वाहतुक हडपसर, मगरपट्ट, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथुन आळंदी आणि चकण कडे जातील.
मुंबईकडुन नगरकडे जाणारी जड वाहतुक वडगाव मावळ,चाकण,खेड,मंचर,नारायगाव आळेफाटा मार्गे जातील.मुंबईकडुन नगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ,चाकण,खेड, पाबळ,शिरुर मार्गे नगरकडे जातील.
अभिवादन करण्यासाठी जाणा-या अनुयायी यांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकुण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. व तेथुन (पार्किंगस्थळावरुन ) विजयस्तंभा जवळ जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्या वत्तीने (पी.एम.पी.एल.) दिनाक ३१ डिसेंबर २०२१ व दि.१ जानेवारी रोजी २६० बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हिड् १९ च्या पाश्वभुमीवर आरोग्य विभागाकडुन प्रथोमउपचार केंद्र उभारण्यात येत असुन ५ अतिदक्षता अॅरब्युलन्स, व १५ अॅरब्युलन्स, ची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १०% बेड राखेव ठेवण्यात आले आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क दिनाक ३१ डिसेंबर २०२१ व दि.१ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. पोलीस विभाग आणी सार्वजनिक बांधकाम विभाग यानी कार्यक्रम स्थळाचा ताबा घेत काम सुरु केले आहे.
विजयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट, सुशोभिकरण करण्यात येणार असुन त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. शासनाच्या वत्तीने सदर कार्यक्रमाचे प्रथमच दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रसासन आणि बार्टी च्या वत्तीने कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.