आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप


आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप
पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी २०२२ । अनेकदा समाजातील अनेक वंचित घटकांना केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजनांचा आपणाला लाभ मिळतो याची माहितीच नसते. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांना मिळावा यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व त्याचा लाभ मिळवून दिला जातो.परिणामी शहरातील शेकडो – हजारो नागरिकांना आमदार अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.
बांधकाम कामगार हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कायम स्थलांतरीत होत असतात.आज या बांधकाम साइटवर, तर उद्या त्या बांधकाम साइटवर हा कामगार स्थलांतर करत असतो. हे करत असताना पोटासाठी लागणारे अन्न शिजवण्याची साधने सुद्धा त्याच्याकडे नसतात.व त्यांच्या सुरक्षिततेची ही म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी करून घेते.त्यांना आय कार्ड च्या द्वारे ओळख दिली जाते.व त्यासाठी लागणारी सरकारी प्रक्रिया नोंदणी पासून ते त्यांना मिळणाऱ्या विविध लाभापर्यत ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी आमदार अण्णा बनसोड प्रयत्न करत आहेत.त्यांच्या जनसंपर्क कार्यलयात बांधकाम नोंदणी साठी स्वतंत्र विभाग केला आहे जेणेकरून बांधकाम कामगारांना थेट लाभ मिळू शकेल.आज नवीन वर्षाचे स्वागत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षितता किट वाटप करून करण्यात आले.
यावेळी आमदार बनसोडे यांच्या हस्ते नोंदित बांधकाम कामगारांना योजनेतून मिळणाऱ्या सुरक्षितता किट ( पेटी) वाटप करण्यात आले. यात बॅटरी , हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा,मच्छरदाणी, बॅग , पाण्याची बाटली ,बूट ,दोरी, हातमोजे , मास्क , जॅकेट हेडफोन , इत्यादी वस्तूंचा समावेश होता .एकूण १५० कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यावेळी बांधकाम कामगार विक्रांत शिंदे , दत्तात्रय शिंदे , कल्पना धाकड, विदुला पिंजण , अश्विनी मोहिते , वीरेंद्र खिलावन , सुनीता खिलावण, संजीवनी कुलकर्णी , संगीता बुरुते , स्वाती मोरे, अर्चना शिरकर सुरेखा मोरे, सुजाता कदम व सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे उपस्थित होत्या .