शहर कॉंग्रेसचे महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार : संजय राठोड आकुर्डी, प्राधिकरण येथे कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी-यांची बैठक

IMG-20220102-WA0167

शहर कॉंग्रेसचे महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार : संजय राठोड
आकुर्डी, प्राधिकरण येथे कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी-यांची बैठक
पिंपरी (दि. २ जानेवारी २०२२) पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड यांनी केले.
रविवारी (दि. २ जानेवारी) आकुर्डी, प्राधिकरण येथे शहर कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राठोड बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शहर कार्याध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे, दिलीप पांढरकर, माजी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्या शोभा पगारे, शहर कॉंग्रेस असंघटीत कामगार सेल अध्यक्ष सुंदर कांबळे, महिला अध्यक्षा शितल कोतवाल, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेल सरचिटणीस किशोर कळसकर, ओबीसी सेल कार्याध्यक्ष वैभव किरवे, शहर उपाध्यक्ष हरिदास नायर, मकर यादव, शहर कॉंग्रेस सरचिटणीस प्रतिभा कांबळे, अनुसूचित विभाग शहर कार्याध्यक्ष हिरामण खवळे, ज्येष्ठ नेते संदेश नवले, गौरव चौधरी, संदेश बोर्डे, विशाल कसबे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय राठोड पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. असे आदेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुर्वीच दिले आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करावे लागेल. येथून पुढे शहर कॉंग्रेसच्या महत्वाच्या निर्णयात प्रदेश कॉंग्रेसचा निरीक्षक म्हणून मी स्वत: लक्ष घालणार आहे. मागील चार दिवसांच्या शहराच्या दौ-यात मी बहुतांशी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. आगामी निवडणूकीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. याची दक्षता प्रदेश कॉंग्रेस निश्चित घेईल. या दौ-याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर करणार आहे असेही राठोड म्हणाले. संजय राठोड यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा व मागील सात वर्षात कॉंग्रेस पक्ष संघटनेत कार्यरत असणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव केला.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे म्हणाले की, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये मागील सात वर्षात पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसमध्ये काम केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी काळात न्याय देण्याची भुमिका प्रदेश पातळीवरुन घेण्यासाठी मी आग्रही राहणार आहे. ज्यांनी पक्ष संघटनेमध्ये काम केलेले आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

स्वागत ॲड. अनिरुध्द कांबळे, सुत्रसंचालन गौरव चौधरी आणि आभार दिलीप पांढरकर यांनी मानले.–

Latest News