लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार


राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीराज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
– लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार
– राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता
– शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता
– दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता
– राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध
– आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी
– मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत राज्य सरकारचा नकारात्मक
नाईट कर्फ्यूची घोषणेवर सरकार विचार करणार
दिल्ली, कर्नाटक प्रमाणे ‘वीकएंड कर्फ्यू’संदर्भात प्रस्ताव विचाराधीन
दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांचं लसीकरण वेगाने होणार
राज्यातील सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकार गती वाढवणार