आम आदमी पार्टी, पंजाब मुख्यमंत्री पदाचा चेहरा भगवंत मान


पंजाब आम आदमी पक्षाचे भगवंत मान प्रमुख आहेत. पंजाबमधील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख आहे. संगरूर लोकसभा मतदार संघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे केवळ एकच खासदार भगवंत मान निवडून आले होते.
अशात या लोकप्रिय चेहऱ्याचा आधार घेत दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने केलेल्या विकास कामांच्या बळावर पंजाबच्या गड सर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.राजधानी दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने छोट्या-छोट्या राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. पंजाबमध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेल्या ‘आप’ला यंदा चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. अशातच पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याची तयारी आपने सुरू केली आहे
.भगवंत मान यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याने औपचारिक घोषणेला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे