दै, पुढ़ारीचे पत्रकार मिलींद कांबळे यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचा उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार महापौर माई ढोरे,आयुक्त राजेश पाटिल यांच्या हस्ते प्रदान

IMG-20220106-WA0316

मिलींद कांबळे यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचा उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार प्रदान

पत्रकारांनी कर्तव्य तत्परपणा आणि जबाबदारीचे भान दाखवून दिले : महापौर माई ढोरे

पिंपरी : ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर महापौर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पत्रकार दिन यांच्या म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त पिंपरी प्रतिमेस चिंचवड मनपा भवन येथे। महापौर माई ढोरे,आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते दैनिक पुढारीचे पत्रकार मिलींद कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कोविड काळात पत्रकारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन वार्तांकन केले. अवघे जग लॉकडाऊन मुळे ठप्प झालेले असताना सर्व देशबांधवांना घरी बसून बातम्या पहाण्यास मिळत होत्या. पत्रकारांनी कर्तव्य तत्परपणा आणि जबाबदारीचे भान त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. अशा पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना मला मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, सोशल मिडीया परिषद महाराष्ट्र प्रमुख बापू गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पक्षनेते नामदेव ढाके, उपस्थित होते यावेळी महापौर हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, ज्येष्ठ पत्रकार बापू गोरे यांनी जी पत्रकार बंधू भगिनींना मनपाच्या रुग्णालयात धन्वंतरी योजना लागू करण्याबाबत केलेली मागणी रास्त आहे. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी युतीचे सरकार असताना पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांना घरकूल किंवा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा पाठपुरावा केला होता. या दोन्ही योजनांसाठी ज्येष्ठ पत्रकारांनीच प्रशासनाकडे आणि पदाधिका-यांकडे पाठपुरावा करावा. आम्ही त्यासाठी सकारात्मक आहोत असे महापौर म्हणाल्या.

यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त
राजेश पाटील म्हणाले की, पत्रकारांनी या स्पर्धेच्या आणि महागाईच्या युगात एकच व्यवसाय किंवा नोकरीवर विसंबून न राहता नियमित उत्पन्न मिळेल असा दुसरा समांतर उद्योग, व्यवसाय करावा. पत्रकारांची लेखणी बंदूकीच्या गोळीप्रमाणे असते. तिचा संयमानेच वापर करावा. एक सच्चा पत्रकार उत्कृष्ठ समाजसेवक होऊ शकतो. अस मत मांडले

Latest News