माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हे दाखल करा


पुणे: भिम शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक/ अध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे प्रभारी, राज्यातील आंबेडकरी नेते माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांना जिवे मारण्याची सुपारी देणाऱ्या समाजकंटक याची चौकशी करून गुन्हा नोंद करून त्यावर कायदेशीर चौकशी करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा असे पोलीस आयुक्त पुणे शहर यांना भिम शक्ती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
चंद्रकांतजी हंडोरे साहेब हे अनुसूचित समाजाचे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यशील अभ्यासू व्यक्तिमत्व व्यक्ती आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वस्तीग्रह बांधण्यात आली तसेच अनेक दलीत शोषित पीडित जमातीतील व्यक्तींना उद्योजक केले
दलित, वंचित ,बहुजन वर्ग समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम मंत्री असताना त्यांनी केली तसेच हांडोरे यांची कामाची दखल घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी वरिष्ठ नेत्यांनी हंडोरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदाचा कारभार देण्यात आला तसेच हंडोरे साहेबांचे बहुजन समाजासाठी अनेक कामांमध्ये त्यांच्या हातभार आहे या संपूर्ण गोष्टीची दखल घेऊन काही समाजकंटकांच्या डोळ्यामध्ये खपत आहे . चंद्रकांत हंडोरे हे मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रभारी आहेत या संपूर्ण यांच्या कामाची दखल काही समाजकंटकांच्या डोळ्यामध्ये खपत असल्यामुळे त्यांना ठार मारण्याची सुपारी देण्यात आली या सर्व बाब लक्षात घेऊन योग्य रित्या कार्यवाही करण्यात यावी
तसेच हंडोरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी तसे न झाल्यास भिम शक्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच हंडोरे यांच्या जीवास काही कमी-जास्त झाल्यास यास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य रित्या कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन. असे निवेदन विजय रामचंद्र हिंगे यांनी दिली तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मिलिंद कुमार रणदिवे अजय जानराव बॉबी राठोड तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते