भोसरीत उभारणार एसटीपी प्रकल्प – स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे


भोसरीत उभारणार एसटीपी प्रकल्प – ॲड. नितीन लांडगे
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) भोसरी परिसरात मागील पंधरा वर्षात लोकसंख्येत खुपच वाढ झाली असून पाणीपुरवठ्यासह इतर आवश्यक यंत्रणेवर ताण वाढत आहे. गव्हाणे वस्ती येथील आदिनाथनगर भागात पावसाळ्यात मलनिस्सारणाचा प्रश्न भेडसावतो. आदिनाथनगर येथील पपिंग स्टेशन परिसरात पावसाळ्यात जमा होणा-या मैला पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भभवतात. यासाठी कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहाशेजारील मोकळ्या चार हजार स्केअर फुट जागेत पुढील पंधरा वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन पाच एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने यापुर्वीच या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थ्थायी समिति अध्यक्ष ॲड.नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.