पुण्यातील बनावट आधार कार्ड देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पुणे: विदेशी नागरिकांना अशाप्रकारे बनावट आधार कार्ड बनवून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.अजीज युसूफ शेख (रा. घोरपडी) आणि जोरना हसीम शेख (34, रा. सिंहगड रोड) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

संबंधित आरोपी बी. टी. कवडे रोड येथील स्काय स्टार मल्टिसर्व्हिसेस येथे बनावट आधार कार्ड बनवून देत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेनं याठिकाणी छापेमारी करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक केली (2 arrested) आहे. संबंधित आरोपी पुण्यातील नगरसेवकांच्या नावानं असलेल्या रबरी शिक्क्यांचा वापर करत, हा बनावट आधार कार्ड बनवून देत होते. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर,

यावेळी आरोपींकडे नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तसेच आधार कार्डची माहिती दुरुस्त करण्यासाठीचे शासनाने निर्धारित केलेले दहा फॉर्म आढळले आहेत. संबंधित फॉर्मवर दहा वेगवेगळ्या व्यक्तींची नावं होती. तसेच फॉर्मवर पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचे नाव व सभासद पुणे मनपा असा उल्लेख असलेला गोल शिक्का आढळला आहे. एवढंच नव्हे तर तर संबंधित फॉर्मवर एका नगरसेवकाची इंग्रजीतून हुबेहूब स्वाक्षरी करण्यात आली होती.

संबंधित आरोपी बांगलादेश आणि इतर देशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देत होते. त्यासाठी लागणारा खोटा रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्रे तयार केली जात होती. यावेळी पोलिसांना कोरेगाव पार्क येथील एका नगरसेवकाचा शिक्का आणि हुबेहूब स्वाक्षरी केलेला फॉर्म सापडला आहे. एका आधार कार्डसाठी आरोपी सातशे रुपये आकारत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Latest News