न्यूझीलंडच्या पंतप्रधान जासिंडा अरडेर्न यांचे कोरोनामुळे लग्न रद्द


न्यूझीलंडमध्ये एका लग्न समारंभानंतर ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि तेव्हापासून येथे रुग्ण वाढण्याचा धोका वाढला आहे. त्याचवेळी ऑकलंडहून लग्न समारंभात सहभागी होऊन एक कुटुंब विमानाने दक्षिण आइसलँडला परतले होते. त्यानंतर दोन सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर न्यूझीलंडमध्ये बंदीची घोषणा करण्यात आली
आणि पंतप्रधानांनी त्यांचे लग्न रद्द केले.न्यूझीलंडच्या पंतप्रधान जासिंडा अरडेर्न (PM Jacinda Ardern) यांनी कोविड-19 चे निर्बंध आणखी कडक करत त्यांनी स्वत:चे लग्न रद्द केले आहे. रविवारी (२३ जानेवारी) त्यांचे लग्न होणार होते, पण ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण पाहता त्यांनी स्वतःचे लग्न रद्द केले आहे आणि लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.जासिंडा अरडेर्न आणि त्यांचा दीर्घकाळचा जोडीदार क्लार्क गेफर्ड यांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही. मात्र आता कोरोनामुळे त्यांनी लग्न रद्द केले आहे
. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर दोघेही पुन्हा एकदा नवीन तारीख जाहीर करू शकतात.२०१७ मध्ये त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी आपल्या पक्षाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. त्यांच्या कामाच्या पद्धतीचे न्यूझीलंडमध्ये खूप कौतुक होत आहे.