प्रजासत्ताक दिनानिमित्त.. गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन


प्रजासत्ताक दिनानिमित्त खादी सप्ताह
……………………………..
गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन
पुणे :
महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ च्या वतीने गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी १२ वाजता झाले. यानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खादी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
खादी कापडचे प्रदर्शन व विक्री
शनिवार दि. 22 जानेवारी ते बुधवार दि. 26 जानेवारी 2022 दरम्यान
सकाळी 10 ते रात्री 8 वाजे पर्यंत सुरू राहणार आहे.
विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रांचा, तयार कपडे उपलब्ध आहेत. नव-नवीन डिझाईन चे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजमा, जॉकेट आहेत.लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे.
साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे.ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे.
सुती खादी वर 20 टक्के सूट तर कोसा कापड वर 15 टक्के सूट जाहीर करण्यात आली.
पुणे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अॅड. संतोष म्हस्के, किशोर फुलंबरकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘ प्रत्येकाने किमान एक खादीचे वस्त्र घेऊन दैनंदिन जीवनात गांधी विचाराचे आचरण करावे ‘, असे आवाहन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.
…